
नरेशजी सुरमवार, निखिलभाऊ सुरमवार यांचा उपक्रम:
व्याहाड खुर्द, ता. १३ : येथील हनुमान चौकात तान्हा पोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुलांनी शेतकरी, बैल व ग्रामीण जीवनाशी संबंधित विविध वेषात भूमिका साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याच कार्यक्रमादरम्यान नरेश सुरमवार, निखिल सुरमवार यांच्या पुढाकारातून दोनशे मुलांना सायकलींचे वितरण करण्यात आले.
बैलपोळा हा शेतकरी व बैलांमधील ऋणानुबंध जपणारा पारंपरिक सण आहे. या सणाचे महत्त्व ग्रामीण भागातील मुला मुलींना समजावे, आपल्या संस्कृतीशी त्यांची नाळ अधिक घट्ट व्हावी या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जोपासत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेश श्रीधरराव सुरमवार आणि निखिल सुरमवार यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी पारंपरिक वेशभूषेत शेतकरी
तान्हा पोळा निमित्त

व्याहाड खुर्द मुलास सायकल भेट देताना नरेश सुरमवार, निखिल सुरमवार.
भूमिका साकारत शेतीप्प्रधान जीवनाचे चित्र उभे केले. अभिनय, संवाद, घोषवाक्य आणि सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे कष्ट, शेतीचे महत्त्व, वैज्ञानिक तंत्र, बेरोजगारी, निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण, प्राणीमात्रांवर दया करा आणि ग्रामीण संस्कृतीची वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडली. तान्हा पोळ्यात दोनशे मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मानले.
कवडू उरकुडे, माजी सरपंच सुनीता उरकुडे, माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोपाल रायपुरे, माजी सदस्य राजू टोंगे, नरसिंग गणवेनवार, विनोद शेंडे, केशव भरडकर, दीपक जवादे, मारोती बाबणवाडे, विठ्ठल टोंगे, राजू तुंगीडवार, हरीदास चिवंडे, आशीष पुण्यपवार यांची उपस्थिती होती. संचालन निकेश आत्राम व प्रवीण टोंगे यांनी केले. आभार विठ्ठल टोंगे यांनी

