
अमोल मारकवार|तालुका प्रतिनिधी

अहेरी | तालुक्यातील मरपल्ली व भस्वापूर शाळेजवळील हनुमान मंदिराच्या नूतन बांधकामाचा भूमिपूजन सोहळा भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.मरपल्ली व भस्वापूर येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी गावात एका सुसज्ज हनुमान मंदिराची मागणी केली होती. गावकऱ्यांची ही श्रद्धा लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी गावाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला होता.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते की, सध्याच्या शासकीय नियमांनुसार शासनाच्या निधीतून थेट मंदिर बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे तात्काळ शक्य नाही.मात्र,नागरिकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा आदर राखत,मी माझ्या स्वतःच्या स्वखर्चातून हे हनुमान मंदिर बांधून देईन”असा ठाम शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला होता.आपल्या दिलेल्या शब्दावर ठाम राहत डॉ.अजय कंकडालवार यांनी काल वैदिक मंत्रोच्चारात या मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन केले.यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनी,युवक आणि काँग्रेस स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मरपल्ली व भस्वापूर हे आदिवासी बहुल भागातील गाव असून, येथील नागरिकांसाठी हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून एकत्र येण्याचे सांस्कृतिक केंद्र ठरणार आहे.नागरिकांनी मागणी करताच कोणतीही राजकीय अडचण न सांगता स्वखर्चाने मंदिर उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मरपल्ली व भस्वापूर येथील समस्त ग्रामस्थांनी डॉ.अजय कंकडालवार यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांच्या या दातृत्वाची आणि शब्द पाळण्याच्या वृत्तीची संपूर्ण अहेरी तालुक्यात चर्चा आणि कौतुक होत आहे.
लवकरच या मंदिराचे बांधकाम पूर्ण करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

