Barhate arrested while accepting a bribe of 12,000

गडचिरोली न्यूज जागर

गडचिरोली जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नितीन बारहाते Nitin Barhate यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी सहा लाख रुपयांचे देयक काढून देण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यावर लाचखोरीच्या आरोपाखाली कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेसह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या प्रकरणात शिपाई ईश्वर निसार Ishwar Nisar याला सुद्धा अटक करण्यात आली आहे
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील प्रलंबित कंत्राटदाराचे सहा लाख रुपयांचे देयक काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता नितीन बारहाते याने 12 हजार रुपयांची लाच मागितली पण कंत्राटदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित कंत्राटदाराने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. Barhate arrested while accepting a bribe of 12,000

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी (28 ऑक्टोबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरात सापळा रचला. सदर रक्कम हि शिपाई ईश्वर निसार याच्या माध्यमातून लाचेची रक्कम स्वीकारन्यात आली, त्यानुसार, कंत्राटदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताना कार्यकारी अभियंता बाराहाते यांना त्यांच्या कार्यालयातच पकडण्यात आले. या कारवाईत शिपाई निसार यालाही अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे गडचिरोली येथील उपअधीक्षक विक्रांत सगणे Vikrant Sagane यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
सदर कारवाहीने जिल्हापरिषद कर्मचाऱयांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. News Jagar

