abhijit wanjari

नागपूर

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहले यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. अपक्ष उमेदवार नितेश कराले मास्तर यांना मिळालेली दुसरी पसंतीची मते निर्णायक ठरली.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजप पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मागे होता. नंतर मात्र सुधाकर कोहळे यांनी जवळपास ५,००० मतांची आघाडी घेतली.

परंतु, शेवटच्या तीन उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होताच कोहळे यांची आघाडी सुमारे १,२०० मतांपर्यंत कमी झाली. newsjagar
कराळे यांच्या समर्थकांची दुसऱ्या पसंतीची मते मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाचे अभिजित वंजारी यांना मिळाली. यामुळे कोहळे यांची आघाडी संपुष्टात आली आणि वंजारी यांचा विजय निश्चित झाला.
नितेश कराळे यांच्या मतांच्या टक्केवारीने संपूर्ण समीकरन बदलवीत पदवीधर निवडणुकांमध्ये दुसऱ्या पसंतीची मते अंतिम निकाल पूर्णपणे बदलू शकतात हे दाखवून दिले. कुण्याही मोठ्या पक्षाचा, नेत्यांचा आणि पैशाचा पाठबळ नसताना अपक्ष राहून स्वतःच्या जीवावर एवढं मतदान आणणे आणि दोन मोठ्या पक्षाला घाम फोडून टाकणे हे सगळं जागरूक पदवीधारकांच्या विश्वासामुळे साध्य झालं आहे. असे सामाजिक प्रसारमाध्यमातून कराळे मास्तरांनी सांगितले आहे.

