
6 महिन्या पासून विरखल पाथरी रस्त्याचे काम अर्धवट !
योगेश रामटेके (विशेष प्रतिनिधी )
सावली :- (न्युज जागर )
सावली तालुक्यातील विरखल ते पाथरी जाणाऱ्या marशेकऱ्यांना शेतीकाम करण्यासाठी ट्रॅक्टर ने आन करणे बैलगाडीने शेतात ये जा करणे कठीण झाले असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
रस्त्यावर गिट्टी चे ढिगारे.ये जा करण्यास शेतकऱ्यांना त्रास होत आहे, एन पावसाळ्यात रस्त्यावर गिट्टी व मुरमाचे ढिगारे असून, रस्त्यावर टाकलेले गिट्टीचे ढिगारे आणि त्यामुळे ये-जा करण्यास शेतकऱ्यांना होणारा त्रास हा ग्रामीण भागातील एक गंभीर प्रश्न बनला आहे. रस्त्यांची कामे अर्धवट सोडल्यामुळे किंवा साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर गिट्टी व मुरूम टाकून तसेच साहित्याचे ढिगारे तिनसे ठेवून रस्ते बंद असून .वाहतुकीस ट्रॅक्टर, बैलगाडी आणि शेतीमाल ने-आण करताना होणारी कसरत.अपघात व नुकसान: खड्डे, चिखल आणि गिट्टीमुळे वाहने घसरून होणारे अपघात.शेतकऱ्यांची गैरसोय, होत असून यामुळे शेतीचे काम करणे, खतांची पोती, बी-बियाणे आणि मजूर ने आन करणे,अवघड होते.वारंवार तक्रार करूनही संबंधीत ठेकेदार किंवा प्रशासन दखल घेत नाहीत. अशी तक्रार परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.


