
गडचिरोलीतील २१५ शाळांमध्ये ‘School Transformation Project’चा प्रभाव; डिजिटल शिक्षणासह पायाभूत सुविधांचा विकास
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक गडचिरोली जिल्ह्यातील शाळांच्या शैक्षणिक व पायाभूत विकासाला नवी दिशा देणाऱ्या **Learning Links Foundation (LLF)**च्या उल्लेखनीय कार्याची जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली आहे. Learning Links Foundationचे जिल्हा व्यवस्थापक उज्वल गोरे यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्याचे शिक्षणमंत्री मा. दादाजी भुसे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Learning Links Foundation आणि National Payments Corporation of India (NPCI) यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या School Transformation Projectमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत आहेत.
२५ शाळांपासून सुरू झालेला प्रवास २१५ शाळांपर्यंत
डिसेंबर २०२१ मध्ये गडचिरोली आणि वाशीम जिल्ह्यात प्रत्येकी २५ शाळांपासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली. शाळा, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने विस्तार झाला. आज हा प्रकल्प गडचिरोलीतील २१५ आणि वाशीममधील १९५, अशा एकूण ४१० शाळांपर्यंत पोहोचला असून, गडचिरोली जिल्ह्यात सध्या Phase-7चे काम सुरू आहे.
शाळांना आधुनिक सुविधांची जोड
School Transformation Project अंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंददायी आणि आधुनिक शिक्षणाचे वातावरण मिळावे, यासाठी शाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये Smart Boards, Digital Learning Content, Science Labs, Libraries, RO Water Systems, Sports Kits, Maths Kits, Health & Hygiene Kits, Toilet Renovation, BaLA, Solar Systems आणि Facade Painting यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.
केवळ सुविधा निर्माण करण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रभावी वापर व्हावा, यासाठी LLFमार्फत Teacher Training, SMC Training, Student Wellness Sessions आणि Summer Camps यांसारखे विविध उपक्रमही राबविले जात आहेत.
शिक्षणासोबत आरोग्य, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासावर भर
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीवरच नव्हे, तर आरोग्य, आत्मविश्वास, सर्जनशीलता, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनकौशल्यांवरही विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक वातावरणाचा अनुभव मिळत असून, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील शाळांपर्यंत विविध सुविधा पोहोचविण्यासाठी Learning Links Foundationची टीम सातत्याने आणि प्रभावीपणे कार्यरत आहे. या उपक्रमाला जिल्हा परिषद प्रशासन, शिक्षण विभाग, मुख्याध्यापक, शिक्षक, SMC सदस्य, पालक आणि शाळा समुदायाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तसेच NPCIच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे या प्रकल्पाच्या विस्ताराला मोठी चालना मिळाली आहे.
उज्वल गोरे यांचा सन्मान म्हणजे संपूर्ण टीमचा गौरव
शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उज्वल गोरे यांचा झालेला सन्मान हा त्यांच्या वैयक्तिक कार्याची दखल असली तरी, तो Learning Links Foundationच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा आणि योगदानाचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सन्मानाबद्दल जिल्हा परिषद प्रशासन, शिक्षण विभाग आणि Learning Links Foundationच्या सहकाऱ्यांनी उज्वल गोरे यांचे अभिनंदन केले.
यावेळी राकेश लोनारकर, अश्विन कोपुलवार यांच्यासह Learning Links Foundationची टीम उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांनी गडचिरोलीतील शाळांच्या शैक्षणिक व पायाभूत विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

