
जिल्हा प्रतिनिधी|
गडचिरोली : २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ८ सप्टेंबर रोजी अहेरी येथील महागांव फंक्शन हॉलमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ‘मिशन २०२६’ अंतर्गत ‘विदर्भ राज्य निर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे रणशिंग फुकण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आ. ॲड. वामनराव चटप होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक देशोन्नतीचे प्रबंध संपादक, शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांच्याहस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. प्रा. नीरजा खोब्रागडे उपस्थित होत्या.

विदर्भाच्या शोषणरून पश्चिम महाराष्ट्राचे पोषण – प्रकाश पोहरे
याप्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. ते म्हणाले की, वर्तमान सरकार विदर्भ विषयी संवेदनशील नाही. विदर्भाच्या शोषणतून पश्चिम महाराष्ट्राचे पोषण होत आहे. गडचिरोली जिल्ह्याला खोदून अब्जो करोडो कमाविلي जात आहे. इथल्या मूलनिवासींच्या हक्कावर गदा आणली जात आहे. विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य होणे आवश्यक आहे.
विश्वेश्वर महाराजांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे – ॲड. वामनराव चटप
मार्गदर्शन करताना समितीचे अध्यक्ष माजी आ. ॲड. वामनराव चटप म्हणाले की, दिवंगत राजे विश्वेश्वर महाराजांनी विदर्भाची प्रामाणिकपणे लढाई लढली. आम्हाला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. महाराष्ट्र सरकार पूर्णपणे दिवाळखोर झाले आहे.
ब्रह्मदेवासाठी मुख्यमंत्री केले आणि १०० वर्ष जरी महाराष्ट्रात राहिले तरी विदर्भाचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल तर सर्वांनी डिसेंबर २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविण्याच्या कार्याला लागावे असेही ॲड. चटप म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्तावनेतून अशोक पोरेड्डीवार यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती आंदोलनाची रूपरेषा विशद केली. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी जनमत तयार करण्याबरोबरच आगामी काळात आंदोलनाची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि ‘मिशन २०२७’च्या माध्यमातून जनसंकल्प अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळेस उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. या मेळाव्यास विदर्भातील अनेक जिल्ह्यातील विदर्भवादी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती: कार्यक्रमाला विदर्भ राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. मंजू तिरपुडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुसकर, पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुण केदार, पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, पूर्व विदर्भाचे उपाध्यक्ष सुनील चोखारे, प्रचारप्रमुख तात्यासाहेब मत्ते, माजी मंत्री तथा कोअर कमिटी सदस्य डॉ. रमेशकुमार गजबे, राजेंद्रसिंग ठाकूर, अशोक पोरेड्डीवार, प्रा. पुरुषोत्तम पाटील, विलास रापर्तीवार, नागसेन मेश्राम, गजानन भटकर, प्रकाश ताकसांडे, सुनील पोरेड्डीवार, शंकरराव पारे, कृष्णा भोंगडे, कपिल इधे, शालिकराम माउलीकर, अतुल सतदेवे, वसंतराव गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

