
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार, गडचिरोली
चामोर्शी: शहरात बालगोपालांसाठी सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता भव्य ‘तान्हापोळा उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आठवडी बाजार चौक, नगर पंचायत समोर, चामोर्शी येथे पार पडेल.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण “चामोर्शी तालुक्यातील प्रथम चामोर्शी रत्न पुरस्कार” हा असणार आहे.

या उत्सवात बालकांसाठी वयोगटानुसार दोन विविध थीमवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, भव्य बक्षिसे दिली जाणार आहेत:
गट ‘अ’ (वयोगट: १ ते ६ वर्ष)
थीम: गडचिरोली जिल्ह्यातील संस्कृती
प्रथम बक्षिस: ₹६,००१/- ( किशोर ओल्लालवार यांच्याकडून)
द्वितीय बक्षिस: ₹५,००१/- सोनाली पिपरे यांच्याकडून)
तृतीय बक्षिस: ₹२,५०१/- (शुभम एंटरप्रायजेस, चामोर्शी यांच्याकडून)
गट ‘ब’ (वयोगट: ७ ते १४ वर्ष)
थीम: रस्ते सुरक्षा
प्रथम बक्षिस: ₹७,००१/- रितेश पालारपवार यांच्याकडून)
द्वितीय बक्षिस: ₹५,००१/- ( कविश्वरराव आईंचवार यांच्याकडून)
तृतीय बक्षिस: ₹३,००१/- ( सूरज प्रकाश शिवनीवार यांच्याकडून)
प्रत्येक बाल स्पर्धकाला राजा गोपिचंद किराणा यांच्याकडून आकर्षक गिफ्ट दिले जाईल.कार्यक्रम वेळेवर सुरू होईल आणि परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
आयोजक अमोल आईंचवार (सामाजिक कार्यकर्ते), प्रेमाताई आईंचवार (नगरसेविका), रमेश अधिकारी, यशवंत त्रिकोडे आणि माधवी पेशट्टीवार यांनी सर्व चामोर्शी शहरवासीयांना आपल्या बालगोपालांना नंदीबैल घेऊन या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

