
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी आनंदाची बातमी असून गोविंदराव वंजारी फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सुमानंद सभागृह (हॉल), साईनगर, गडचिरोली येथे सकाळी ९.०० वाजता सुरू होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात ५० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार असल्याने मोठ्या संख्येने युवक-युवतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मेळाव्यासाठी येणाऱ्या उमेदवारांनी काही महत्त्वाच्या सूचनांची नोंद घ्यावी. नोंदणी टेबल सकाळी ११.३० वाजता बंद करण्यात येणार आहे. तसेच मुलाखती “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” (First Come, First Serve) या तत्त्वावर घेतल्या जाणार असल्याने उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, उमेदवारांना प्रभावी रेझ्युमे तयार करता यावा यासाठी मेळाव्यापूर्वी ऑनलाइन रेझ्युमे मार्गदर्शन सत्र देखील आयोजित करण्यात येणार आहे.
रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा:
https://forms.gle/PTnDztuUpKpaGRAr7
अधिक माहितीसाठी किंवा शंकानिरसनासाठी +91 88057 42146 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

