
सामाजिक, पत्रकारिता व सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी तथा अपर डिपरचे अध्यक्ष रुपराज वाकोडे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भोलू सोमणानी व शीतल सोमणानी यांच्या हस्ते रुपराज वाकोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी रुपराज वाकोडे यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे आणि जनसामान्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडणारे पत्रकार म्हणून रुपराज वाकोडे यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भोलू सोमणानी, शीतलताई सोमणानी, नितीन चिलमवार, फुलचंद वाघाडे, सुभाष गोंगले, सचिन उमरे, शाहरुख शेख, संपत यांच्यासह मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना संपूर्ण कार्यक्रमात आपुलकी, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मित्रपरिवार व हितचिंतकांनी रुपराज वाकोडे यांच्या निरोगी, यशस्वी आणि उज्ज्वल भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

