
रस्ते झाले, चिखलमय वाहतुकीची कोंडी!
योगेश रामटेके( विशेष प्रतिनिधी )
सावली:- नगर पंचायत च्या अनेक प्रभागामध्ये भूमिगत विद्युत केबल जोडणीचे काम सुरु असून या कामामुळे रस्ते खोदणे आणि तोडफोड होणे ही एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांचे हाल आणि रस्ते खराब होण्याची समस्या निर्माण झाली आहे.आणि खोदकाम: वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि वरच्या तार हटवण्यासाठी रस्ते खोदले जातात. रस्ते खोदल्याने नागरिकांना चालणे व वाहन चालवणे कठीण होते आहे. ऐन पावसाळ्यात भूमिगत केबल चे कम सुरु असल्याने सावली येथील अनेक प्रभागात वाहतुकीस कोंडी निर्माण होत आहे. मातीच्या ढीगरे रोड चा कडेला असल्याने समूर्ण रस्ते चिखलमय झाले आहेत. दुसरी समस्त्या अशी की रोड चि तोडफोड करून ठेकेदार मोकडे होत असून दुरुस्तीचा अभाव होत आहे.केबल टाकल्यानंतर रस्ते वेळेवर पूर्ववत न केल्याने खड्डे पडतात.उपायांची माहितीसमन्वय: रस्ते व वीज विभागांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.पुनर्वसन: केबलचे काम झाल्यानंतर रस्ते तातडीने दुरुस्त करणे बंधनकारक असते. पण असे होताना दिसत नाही याकडे समंधित विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


