
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी,दि.२४ जूलै :
भारतीय जनता पार्टी चामोर्शी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा महोत्सव २०२६’ अंतर्गत दिनांक २३ जुलै २०२६ (गुरुवार) रोजी चामोर्शी येथील साधूबाबा कुटी हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्षा रोशनी स्वप्निल वरघंटे,नरेश अल्सावार,निरज रामानुजमवार,रेवनाथ कुसराम, सोपान नैताम,रंजना तालेवार तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन हीच भावी पिढीसाठीची सर्वोत्तम भेट,” या उद्देशाला समोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला. स्वच्छ परिसर, हरित वातावरण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव या उद्देशापोटी आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.
यावेळी स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.

