
अरुण बारसागडे, उपसंपादक, न्युज जागर

- सावरगाव :
तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोविंदपुर उपक्षेत्रातील गिरगाव बीटातील, कन्हाडगाव– गिरगाव नाल्याच्या लगत असलेल्या शुल्का अमरसिंग निकुरे, गट नंबर 338, गिरगाव यांच्या शेतीमध्ये गवत कापण्याचे काम करत असताना देवाजी पांडुरंग वाढई वय 65 वर्ष राहणार गिरगाव. याला सकाळी 11:30 वाजता च्या दरम्यान त्या परिसरातून ये जा करणाऱ्या तिथून जाणाऱ्या वाघाने हमला करून त्यांना जखमी केले. त्याची हाक ऐकून धान कापणाऱ्या मजूर महिला हा जेवण करत असताना त्याच्या दिशेला महिलांनी धावा घेऊन वाघाला हाकलून लावले.
सदर घटनेची माहिती मिळताच गिरगावचे विनोद भाऊ बोरकर हे घटनास्थळी दाखल झाले. व या संदर्भात वन विभागाला माहिती दिली. तात्काळ तळोदीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी, क्षेत्र सहाय्यक जी.एम. हिंगणकर, वनरक्षक पंडित मेकवाड, वनरक्षक मइन, स्वाब संस्थेची टीम,हे घटनास्थळी दाखल झाले. व जखमीला तात्काळ उपचाराकरिता सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले जखमीच्या डोक्याला व हातावर वाघाच्या नखांचे किरकोळ जखमा झाले असून वन विभागाने सदर हमला करणाऱ्या वाघाची माहिती गोळ्या करण्याकरता घटनास्थळी कॅमेरे लावले. यावेळेस स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख जीवे सयाम अध्यक्ष यश कायरकर आणि त्यांची टीम, पोलीस निरीक्षक राहुल गुहे व गिरगावचे पोलीस पाटील बोरकर,इतर उपस्थित होते.

परिसरात वन विभाग द्वारे गस्त वाढविण्यात आली असून “लोकांनी शेताचे काम करताना जंगलालगतच्या ठिकाणी वावरताना सावधानता बाळगावी” अशी सूचना तळोधी चे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी यांनी दिल्या.

