
मूल न . पा पाणीपुरवठा कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर इंटक आक्रमक;
मागण्या पूर्ण न झाल्यास कंत्राटदार विरोधात इंटकच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा कंत्राटी कामगारांचा आंदोलनाचा इशारा..
न्यूज जागर | चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी..
मूल नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) आक्रमक झाली आहे. किमान वेतन, पीएफ, ईएसआयसी, सुरक्षा साहित्य आणि वेळेवर वेतन मिळावे, या मागण्यांसाठी इंटकच्या वतीने ६ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे .

निवेदनात ‘रुद्राक्ष डेव्हलपर्स’ मार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार किमान वेतन, पीएफ व ईएसआयसीचे लाभ मिळतात का, याची चौकशी करावी. तसेच आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दर महिन्याचे वेतन ७ तारखेपर्यंत बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची कामगार विभागामार्फत चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास इंटकच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा नागपूर विभागाचे प्रभारी दत्तात्रय समर्थ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन पाठविण्यात आले आहे . निवेदनाच्या प्रती कामगार आयुक्त, सहायक कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧 News Jagar Chandrapur District…
अधिक बातम्या आणि जाहिरातीसाठी….
संपर्क करा. मो 9307553014..

