
ऑरो प्लांट्स बंद असल्याने कोल्हापूर (गुडा) येथिल नागरिक त्रस्त.
योगेश रामटेके (न्युज जागर)
कोरपना:- तालुक्यातील आवाळपुर ग्रामपंचायत हद्दीत येत असलेले कोल्हापूर गुडा हे आदिवासीनी विकसित असलेले छोटासा गाव आहे.या गावात दोनशे पन्नास अश्या एकूण गावाची लोकसंख्या आहे. ज्या पद्धतीने या देशाचे विश्र्वगौरव , देशगौरव , भारताचे लाडके प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांनी जल जिवनाच्या माध्यमत्न “हर घर’ जल मिशन” अशी सकल्पपूर्वक विचार मांडल्या. आणि जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत व अल्ट्राटेक कंपनी यांच्या सौजण्याने या गावात एक नाही तर दोन ऑरो प्लांट याठिकाणी बसविण्यात आले.. पण काही करणात्सव दोन ऑरो चालू न ठेवता बंद करुन दुसरा ऑरो चालू करण्याची संमती ग्रामपंचायतीने दिले. मात्र काहीच दिवस हा ऑरो प्लांट चालू असता काही तांत्रिक अडचणीने ऑरो बंद पडला… आणि आदिवासी लोकसंख्येने वसलेलं छोटस गाव असल्याने येथील वारंवार तक्रार देवून सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करून राहली. याठिकानी एकीकडे हेच लोक मतदानाच्या वेळी हात जोडत आम्हाकडे येतात आणि गावकरी लोक मदतीच्या आशेने कोणाकडे हात जोडावे असे त्रस्त गावकरी म्हणत आहे.

