
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची- बोटेकसा- बोरी या मार्गाची बस, रस्ता खराब असल्याने बोटेकसाला न जाता कोरची- बेतकाठी- बोरी ला जात आहे. मात्र भाडे व्हाया बोटेकसाचे घेत आहे.
कोरची. दिनांक 28/12/25
सर्वसामान्य प्रवाशान्साठी असलेली महामंडळाची लाल परी गेल्या बारा वर्षापासून फक्त पाच किमी अन्तर रस्ता खराब असल्याचे कारण पुढे करून चालक व वाहक यांनी आपल्या मनमर्जीने मार्ग बदलून बस नियमित सुरु ठेवली. परंतु तिकीटाचे दर कायम ठेवल्याने प्रवाशान्ची लुट केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गडचिरोली डेपोवरून कोरची ते कोटगुल व्हाया बोटेकसा आणि कोरची ते बोरी व्हाया बोटेकसा अशी दोन बसेस चालायच्या. परंतु बोटेकसा ते बेतकाठी हा जिल्हा परिषद बान्धकाम विभागाच्या हद्दीतीत जवळपास पाच किमी अन्तर रस्ता खराब आहे. त्यामुळे या रस्त्याने बस न टाकता, कोरची वरून बोरी किंवा कोटगुलला जाताना व्हाया बोटेकसा न टाकता, व्हाया बेतकाठी बस टाकत आहेत. परंतु भाडे व्हाया बोटेकसा चे घेतल्या जात आहे. newsjagar
बोरी किंवा कोटगुल ला व्हाया बोटेकसा जाताना भिमपूर, सोहले, बिहीटेकला, मर्केकसा, बोटेकसा ही मोठी गावे रस्त्यावर पडतात. परंतु बस व्हाया बेतकाठी गेल्यामुळे वरील गावातील प्रवाशान्ना महामंडळाच्या सेवेचा फायदा मिळत नाही.
बोटेकसा ते बेतकाठी हा पाच किमी अन्तरचा रस्ता बान्धकाम करण्यासाठी आमदार किंवा खासदारानी पुढाकार घ्यावा आणि
वरील दोन्ही बसेस व्हाया बोटेकसा जाऊ द्यावे. कारण बोटेकसा हे छत्तीसगड राज्याच्या सिमेवरील मोठे गाव असून या मार्गे लोक मोठ्या प्रमाणात छत्तीसगड राज्यात जातात. भौगोलिक दृष्ट्या कोरची तालुका आणि छत्तीसगड राज्यात मानपूर- मोहला- चौकी हा जिल्हा सिमावर्ती भागात असून या परिसरातील बरेच नातेसंबंध आहेत. त्यामुळे हा रस्ता महत्वाचा आहे.
कोट.
याबद्दल आम्हाला कल्पना नव्हती. आजच याबद्दल माहीती मिळाली आहे. बदललेल्या मार्गाची तिकीट पास मशीन मध्ये टाकून दिली जाईल. आता प्रवाशाकडून लुट होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
… सोनाली लिचडे
वाहतुक व्यवस्थापक गडचिरोली

