
सावनेर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा
सावनेर, ता. २४: घरातून शाळेसाठी निघालेला मुलगा बेपत्ता झाल्याची घटना २१ नोव्हेंबर ला घडली आहे , भावेश विनोद खोडणकर BHAVESH VINOD KHODANKAR (१३). यशवंतबाबा झोपडपट्टी, सावनेर असे या बेपत्ता मुलाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे भावेश स्कूल बसने सकाळी शाळेत गेला. मात्र सायंकाळी तो घरी परतलाच नाही. त्यामुळे शोधाशोध करण्यात आली. newsjagar
सावनेरमधील वॉर्ड क्र.६, यशवंतबाबा झोपडपट्टी येथे वास्तव्यास असणारे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे खोडणकर दाम्पत्य यांचा मुलगा भावेश हा सावनेर येथील भालेराव हायस्कूलमध्ये आठव्या वर्गात शिकतो. २१ नोव्हेंबरला भावेश घरी न आल्याने पालकांनी वर्गशिक्षकांना फोन करून विचारणा केली. शिक्षकांनी भावेश आज शाळेत आलाच नसल्याचे सांगितले. त्यानंतर पालकांनी ट्युशनमध्ये चौकशी केली असता तिथेही तो गेला नसल्याचे समजले. भावेश हा शाळेच्या बसमध्ये बसला होता. मात्र शाळेत पोहोचला नाही. Boy who went by school bus from Saoner did not return – parents’ outcry
याप्रकरणी सावनेर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मुलाची शोध मोहीम सुरू केली असता भावेश ने शाळेच्या बसमधून उतरल्यावर मागच्या गेटने स्थानिक बसस्टँड गाठले. बसमध्ये बसून नागपूरला गेला. रेल्वेस्थानकावर जाऊन गोंडवाना एक्सप्रेसमध्ये बसून निघाल्याचे आढळून आले. त्यामुळे शोध घेण्यासाठी पोलिसांची एक तुकडी दिल्लीला रवाना झाली आहे.


मुलगा अल्पवयीन असून अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आई-वडीलानी व्यक्त केला आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून सावनेर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बी. जी. राठोड करीत आहेत.
भावेश चे वर्णन खालीलप्रमाणे असून , वर्ण गोरा, उंची ५ फूट, अंगात पांढरा शर्ट, खाकी रंगाची पँट, शाळेचे लाल रंगाचे जॅकेट, पाठीवर काळ्या रंगाची बॅग, पायात काळ्या रंगाचे शाळेचे बूट, डाव्या हातात उंच वाली घड्याळ, सोबत लाल रंगाची टिफिन बॅग (बास्केट), पाठीवर लालसर रंगाचा डाग आहे. कुणालाही या भावेश बद्दल माहिती मिळाल्यास सावनेर पोलिस ठाण्याशी संपर्क अथवा त्याचे पालक (मोबाईल): ७३०४८९७९५३ यांचेशी संपर्क साधावा .

