
आकर्षक नंदीबैल सजावटीने वेधले लक्ष; इंजि. प्रमोदजी पिपरे व योगिताताई पिपरे यांच्या हस्ते बालगोपालांचा गौरव
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली | : महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी संस्कृतीची परंपरा जपणारा आणि बालगोपालांच्या विशेष आवडीचा तान्हा पोळा उत्सव गडचिरोली शहरातील रामनगर, लांजेडा व इंदिरानगर परिसरात मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या लाकडी व मातीच्या नंदीबैलांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने परिसरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले.

तान्हा पोळ्यानिमित्त बालगोपालांनी रंगीबेरंगी फुले, विविध आकर्षक साहित्य आणि कल्पक सजावटीने नंदीबैल सजवून कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. अनेक चिमुकले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. नंदीबैलांची मनमोहक सजावट, चिमुकल्यांचा उत्साह आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे रामनगर, लांजेडा आणि इंदिरानगर परिसरात तान्हा पोळ्याचा जल्लोष पाहायला मिळाला.
या उत्सवाला इंजि. प्रमोदजी पिपरे, संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे तथा माजी सभापती, नगरपरिषद गडचिरोली तसेच योगिताताई पिपरे, जिल्हाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा तथा माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद गडचिरोली यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते तान्हा पोळ्यात सहभागी झालेल्या बालगोपालांना विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी इंजि. प्रमोदजी पिपरे व सौ. योगिताताई पिपरे यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तान्हा पोळ्यासारख्या पारंपरिक उत्सवांमुळे नव्या पिढीला महाराष्ट्राची कृषी संस्कृती, सण-परंपरा आणि बैलपोळ्याचे महत्त्व समजते. अशा उपक्रमातून बालगोपालांमध्ये आपल्या संस्कृतीविषयी प्रेम, जिव्हाळा आणि अभिमान निर्माण होतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
रामनगर येथे श्री. सुरेशजी मांडवगडे, रमेश भुरसे, संजय मांडवगडे, नगरसेविका वर्षाताई शेडमाके, मंदाबाई मांडवगडे, कविताताई उरकुडे, नामदेव शेंडे, भैय्याजी येरमे यांची उपस्थिती होती.
लांजेडा येथे नप शिक्षण सभापती हर्षल गेडाम, नगरसेविका कोमल नैताम, छत्रपती नैताम, विक्की नैताम, प्रदीप भांडेकर, गणेश नैताम, नरेंद्र भांडेकर, माजी नगरसेविका बेबीताई चिचघरे, तानाजी भुरसे आदी उपस्थित होते.
इंदिरानगर येथे पंकज बंडूजी नैताम, पिपरे पेट्रोलपंप सर्व्हिसेसचे संचालक इंजि. अनुराग पिपरे, शुभम भांडेकर, भुमेश भांडेकर, अखिल नैताम, लोकेश पिपरे, दामोधर कुकडकार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
रामनगर, लांजेडा व इंदिरानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते. बालगोपालांसोबत पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने तान्हा पोळा उत्सव आनंद, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीच्या जल्लोषात पार पडला.

