
ॲड. दुष्यंत नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची रेलचेल; विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन अन् मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.१३ सप्टेंबर : युवकांच्या उत्साहाला क्रीडा, आरोग्य आणि शिक्षणाची जोड देत गडचिरोली शहरात ‘छात्रो की गुंज’च्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेल्या भव्य महा मॅरेथॉन स्पर्धेने अक्षरशः शहर दणाणून सोडले. खासदार डॉ. नामदेव जी. किरसान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ॲड. दुष्यंत नामदेव किरसान मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित या उपक्रमाला विदर्भभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि विदर्भातील विविध भागांतून तब्बल १० हजारांहून अधिक युवक-युवती सहभागी झाले.

युवकांमध्ये आरोग्य, व्यायाम, क्रीडाभावना आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महा मॅरेथॉनमुळे गडचिरोलीच्या रस्त्यांवर तरुणाईचा उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने युवक-युवतींनी सहभाग घेतल्याने संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले होते.
वाढदिवसाला सामाजिक उपक्रमांची अनोखी भेट
ॲड. दुष्यंत नामदेव किरसान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर यांच्या विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक पर्याय आणि भविष्यातील नियोजन याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले. बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता योग्य ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
खासदार किरसान यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद
कार्यक्रमादरम्यान खासदार डॉ. नामदेव जी. किरसान यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी, उपलब्ध शैक्षणिक संधी आणि भविष्यातील करिअरचे योग्य नियोजन याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खासदारांचा थेट संवाद मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोफत अभ्यासिकेची मोठी सुविधा
ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सक्षम वातावरण मिळावे, या उद्देशाने मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. या सुविधेमुळे आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार असून, गडचिरोलीतील युवकांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या संपूर्ण उपक्रमातून ‘युवकांची ऊर्जा क्रीडेत, विद्यार्थ्यांची जिद्द शिक्षणात आणि समाजाची प्रगती विकासात’ असा सकारात्मक संदेश देण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांच्यासह प्रमोद भगत, वसंत राऊत, राजेंद्र बुल्ले, मनोज अग्रवाल, विजय पाटील गावंडे, खेमराज तिडके, प्रमोद चौधरी, नितीन गोहने, प्रशांत कोराम, प्रमोद गोटेवार, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, माधव गावड, इशुलालजी भालेकर, देवकांत बहिकार, राजेश ठाकूर, देवाजी सोनटक्के, रवींद्र पाल, दत्तात्रय खरवडे, दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, कुणाल पेंदोरकर, श्रीकांत देशमुख, मनोज ढोरे, हरबाजी मोरे, दिलीप घोडाम, विनोद लेनगुरे, परमेश्वर गावडे, प्रतीक बारसिंगे, विजय लाड, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, उत्तम ठाकरे, धिवरू मेश्राम, जावेद खान, स्वप्नील बेहरे, कमलेश खोब्रागडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती व पालक उपस्थित होते.

