
नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली

कोटगुल परिसराने गमावले लढाऊ नेतृत्व; शिवसेनेत मोठी पोकळी
कोरची, प्रतिनिधी : पिटेसूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ शिवसैनिक भारतशाह कुंजाम (वय ६५, रा. आलोंडी) यांचे मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कोटगुल परिसरातील एक लढाऊ नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत असून, शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

भारतशाह कुंजाम हे सन १९९० पासून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले होते. प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाशी निष्ठा कायम राखत त्यांनी परिसरात शिवसेनेचे कार्य केले. पिटेसूर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करताना त्यांनी स्थानिक पातळीवर नेतृत्वाची भूमिका बजावली.
दीर्घकाळ शिवसेनेशी जोडलेले राहून त्यांनी पक्षाच्या विचारांवर निष्ठा ठेवली. त्यांच्या निधनामुळे कोटगुल परिसरातील शिवसैनिकांनी एक अनुभवी, निष्ठावान आणि लढाऊ सहकारी गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याची भावना शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.
भारतशाह कुंजाम यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आलोंडी येथे दिनांक 28 ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता अंतिम संस्कार होणार आहे असे अर्जुन कुंजाम यांनी दिली त्यांच्या पश्चात. पत्नी तीन मुली दोन मुले असा परिवार आहे

