
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्षात नियोजन बैठक; विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी,दि.१२ सप्टेंबर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’ला चामोर्शी तालुक्यात व्यापक स्वरूप देण्यासाठी भारतीय जनता पार्टी चामोर्शी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्र. २, चामोर्शी येथे झालेल्या या बैठकीत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, सेवाभावी व जनहिताच्या उपक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अभियान यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
‘सेवा हीच संघटनेची शक्ती’ या भावनेतून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून लोकहिताचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक कार्यकर्त्याने अभियानाची जबाबदारी आपल्या पातळीवर प्रभावीपणे पार पाडावी, याबाबतही बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघंटे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नीरज रामानुजनवार, भाजयुमो जिल्हा सचिव नरेंद्र अलसावार, तालुका महामंत्री संजय खेडेकर, तालुका महामंत्री विष्णू ढाली, भाजयुमो तालुका अध्यक्ष भुवनेश्वर चुधरी, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा कविताताई किरमे, महिला मोर्चा तालुका महामंत्री तृप्ती चिळंगे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष रोहिदास धोटे, महादेव निकोडे, तालुका उपाध्यक्ष हर्षद भांडेकर, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष संजय चलाख, तालुका सचिव दीपक भांडेकर, भारत धोडरे, भाजयुमो तालुका महामंत्री गितेश बारसागडे, रामचंद्र वरवाडे, सुजित मंडल, विशाल माळवे, सोशल मीडिया प्रमुख प्रलय सहारे, विनोद किरमे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

