
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अनुपस्थित राहणे ग्रामपंचायत अधिकार्यांना महागात पडले आहे.
वर्धा – वर्धा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी तब्बल ७ ग्रामपंचायत अधिकार्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अनुपस्थित राहणे महागात पडले आहे. त्यांची एका दिवसाची वेतन कपात केली असून एका वेतनवाढीवर रोक लावण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पराग सोमन यांच्याकडे पाठविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी २८ रोजी पीएआय संदर्भातील आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलावली होती. Wardha Gram Panchayat या बैठकीस ७ ग्रामपंचायतीतील अधिकारी अनुपस्थित राहिले. तसेच पीएमएवाय अंतर्गत वारंवार सूचना देऊनही सहा महिन्यांपासून घरांच्या फेरफार प्रस्तावांची पूर्तता न केल्याने ग्रापं अधिकारी मयूर इंगोले, सचिन वैद्य, ए. एस. वरघणे, एस. एल. शिंदे, डी. एन. खराबे, डी. डी. चटप आणि अजय पाटील यांच्या २८ रोजीच्या एका दिवसाची अनुपस्थिती नोंदवली. त्यांचा एका दिवसाचा वेतन तसेच एका वेतनवाढीवर रोक लावण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या कारवाईमुळे ग्रामपंचायत अधिकार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

