
वर्धा – आर्वी मार्गावरील विट भट्टीवर सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून पुलगावात नावाजलेल्या ९ जणांना अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाखांची रोखसह महागडे वाहनं असा ७४ लाख ८ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवार २९ रोजी पुलगाव पोलिसांनी केली आहे.
जुगाराबाबतची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांना मिळाली. त्या आधारे त्यांनी आपल्या पथकासह छापा टाकला. यावेळी ९ जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४ लाख ४९ हजार १३० रुपयांची रोख जप्त करण्यात आली. Raid on gambling in Pulgaon यासोबतच एम. एच. ३१-६५८५, एम. एच. ३२-७८९१, एम. एच. ३२ ए. एस. ९९७७, एम. एच. ३२ ए. एस. २२९२ आणि एम. एच. ३२ ए. डब्ल्यू. ७४१६ क्रमांकाची पाच महागडी वाहनं, तीन मोबाईल ताब्यात घेण्यात आली. यासोबतच किशोर कल्पे (५६) रा. नाचणगाव, प्रमोद हरणे (४४) रा. बोरगाव मेघे वर्धा, प्रमोद घालणी (५७) रा. मीरा कॉलनी, नितीन रघाटाटे (५३) रा. शिवाजी कॉलेज, कैलाश घारवारकर (५२) रा. बायपास रोड वर्धा, भूषण वाघमारे (३५) रा. पुलगाव, आशिष सावरकर (४०) आर्वी रोड पुलगाव, रितीश चवरे (४०) रा. बॅचलर रोड वर्धा, दत्तात्रेय बिरे (५८) रा. चिंतामणी कॉलेज वर्धा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
विशेष म्हणजे, आर्वी मार्गावरील एका नामवंत मंगल कार्यालयात नेहमीच जुगार भरत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांनी यूआर कोड जनतेच्या सेवेत रुजू केला आहे. Raid on gambling in Pulgaon टेलिग्राम अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून यूआर कोड स्कॅन करून गुन्ह्याची माहिती थेट पोलिसांना देण्याचे आवाहन केले होते आणि आज मोठा जुगार उधळून लावल्याने पुलगाववासीयांनी त्या आवाहनाला साद दिल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


