
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार रामदासजी मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या आरोग्याची काळजी घेत भव्य महाआरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका काँग्रेस कमिटी आरमोरी तथा आमदार रामदासजी मसराम मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर श्री. किसनजी खोब्रागडे महाविद्यालयाच्या आवारात, वैरागड, ता. आरमोरी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे.

शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हृदयरोग, हाडांचे विकार, स्त्रीरोग आणि नेत्ररोग यांसह विविध आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच रक्तदाब व मधुमेह तपासणी, आवश्यक औषधांचे मोफत वितरण आणि गरजू नागरिकांना चष्मे वाटप करण्यात येणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या संदेशातून निरोगी समाजाच्या दिशेने एक पाऊल म्हणून या शिबिराकडे पाहिले जात आहे. शिबिरासाठी येताना नागरिकांनी आधार कार्ड तसेच केशरी/पिवळे रेशन कार्ड सोबत आणावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

