
प्रलय सहारे
भेंडाळा : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन भेंडाळा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्रात मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. शुभम दुमपट्टीवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत सामूहिकरित्या राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपस्थितांनी देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये जपण्याचा संकल्प केला. आरोग्य सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे भेंडाळा परिसरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित झाला.

