
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दिल्ली दि.६ जूलै:
गडचिरोली जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनी वाचवण्यासाठी संसदेत ठोस आवाज उठवावा तसेच केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राज्यसभा खासदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्याकडे गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली.

महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळाने खासदार राऊत यांची भेट घेत जिल्ह्यातील प्रस्तावित भूमी अधिग्रहणाबाबत सविस्तर माहिती दिली.
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या सुपीक शेतीचे अधिग्रहण करण्यात येत असल्याने हजारो शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्यावर संकट निर्माण होणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी शेतकऱ्यांनी संसदेत हा विषय प्रभावीपणे मांडून सुपीक शेतजमिनींचे संरक्षण करण्यासाठी शासनावर दबाव आणावा, अशी मागणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचविणाऱ्या कोणत्याही निर्णयाचा पुनर्विचार करून शेती व शेतकऱ्यांचे अस्तित्व अबाधित ठेवावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या प्रसंगी मनोहर पा. पोरेटी, ॲड. दुष्यन्त नामदेव कीरसान, दिवाकर निसार (हिरापूर), प्रमोद भगत, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, वसंत राऊत, राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, धिवरू मेश्राम, विकास जेंगठे, मारुती कांबळे, रवी बोदलकर, निकेश तुंकलवार, साईनाथ चलाख, सुनील कोहपरे, भक्तदास भगत, मनोज दहेलकर, गुरुदास ठुसे, वसंत बुर्णवार, तात्याजी चिचघरे, गुरुदास ठाकरे, विजय निकुरे, विजय लाड, नदीम नाथानी, विपुल एलटीवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

