
प्रलय सहारे
भेंडाळा| प्रतिनिधी
गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून भेंडाळा, दोटकुली, कान्होली, रामाळा आणि एकोडी येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
नोटबुक वाटप कार्यक्रमावेळी संजयभाऊ चलाख, पुनेश्वर तुंमडे, संजुभाऊ खेडेकर, प्रलय सहारे, संतुल चौधरी, रविभाऊ धोटे, पितांबर सोरते, लचमा शिरगावार, गुरुनुळे मॅडम, मेकतिवार मॅडम, डोहणे सर तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असून, भविष्यातही समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

