
संघटनेचे सोळाव्या दिवशीही उपोषण सुरू; मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली(कुरखेडा) : कुरखेडा तालुक्यातील सरपंच व उपसरपंच संघटनेच्या वतीने बदनामग्रस्त सहाय्यक गटविकास अधिकारी देवांश उराडे यांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण सोळाव्या दिवशीही सुरू आहे. मागणीला अद्याप ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष नंदू नरोटे , बुभामली भिंगर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांनी उराडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, वरिष्ठांच्या परवानगीने त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तीवरच निलंबनाची कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी संपर्क साधून मुंबई गाठण्याची तयारी दर्शविली आहे. तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंच संघटनेचे पदाधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत.
मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे कुरखेड्यातील या उपोषणाकडे प्रशासनाचे लक्ष लागले असून, पुढील काळात प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

