
प्रलय सहारे
प्रतिनिधी |भेंडाळा : विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने चामोर्शी तालुक्यातील प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळाचक येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरच्या माध्यमातून राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेतला.
निवडणुकीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. मतदान, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली.

निवडून आलेल्या शालेय मंत्रिमंडळातील पदाधिकारी पुढीलप्रमाणे : मुख्यमंत्री – आनंद श्रीकृष्ण सरपे, उपमुख्यमंत्री – श्रेयश सुरेश दुर्गे, शिक्षणमंत्री – सुप्रिया देवानंद कोसनकर, उपशिक्षणमंत्री – प्रणाली महेंद्र सोमनकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी – सलोनी राकेश वाळके, सांस्कृतिक मंत्री – प्रणाली संतोष बारसागडे व जयश्री माधव मिसार, क्रीडामंत्री – आदित्य साईनाथ खरबनकर व मैथिली अरविंद सिडाम, सहल व पर्यटन मंत्री – संजीवनी कवेश वैरागडे व संस्कृती पंकज ठाकूर, माहिती व प्रसारण मंत्री – ईश्वर्या चंदू ठाकूर व डिंपल संतोष काकडे, स्वच्छता व आरोग्य मंत्री – संचाली मनोज मडावी व रोहित अशोक काकडे, कामगार कल्याण मंत्री – जय प्रमोद काकडे, पर्यावरण मंत्री – वैष्णवी जीवनदास बारसागडे व चेतन ताराचंद वेलादी, शालेय पोषण आहार मंत्री – धनश्री संतोष कोहपरे व अनुष्का केशव उडान, तर ग्रंथालय व पुस्तक पेढी मंत्री – अंशुक अमरदीप ठेमस्कर व प्रियंका केशव उडान यांची निवड झाली. तसेच इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गनायक व उपवर्गनायकांचीही निवड करण्यात आली.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मुख्याध्यापक ए. के. टिचकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मुख्य निवडणूक अधिकारी बी. यू. कुळवे यांनी निवडणुकीची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच ए. के. दुधे, डी. ए. बोधे, अनुराधा डाखरे, महेश गोहणे, शिवानी कुथे या शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी मनीषा बांबोळे, कवडुजी येमजेलवार, ऋषिजी वासेकर आणि नेहाल आभारे यांनी निवडणूक यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान करून लोकशाहीचा खऱ्या अर्थाने उत्सव साजरा केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही मूल्यांची प्रभावी रुजवण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

