
चामोर्शी ,दि.३० जूलै : प्रतिनिधी
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा, चामोर्शीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करून सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमातून रुग्णांना आधार देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श संदेश देण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा युवा मोर्चा चामोर्शीचे तालुका अध्यक्ष भुवनेश्वर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रलय सहारे, गितेश बारसागडे, रामचंद्र वरवाडे, मोहन चिळंगे आणि जितू कुनघाडकर उपस्थित होते.या सेवाभावी उपक्रमाचे नागरिकांनी तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कौतुक केले.

