
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी जिल्ह्यात विविध सेवाभावी व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत आरोग्य, शिक्षण आणि जनकल्याणाशी संबंधित विविध उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा केला जाणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता गडचिरोली येथील महिला रुग्णालयात नवीन सुविधांचे उद्घाटन तसेच नवजात बालकांना आवश्यक साहित्य वाटपाने होणार आहे.

यानंतर सकाळी १० वाजता श्रीक्षेत्र सेमानादेव येथे सायन्स पार्कचे उद्घाटन व दर्शन कार्यक्रम पार पडेल.
सकाळी ११.४५ वाजता श्रीक्षेत्र मार्कंडादेव (ता. चामोर्शी) येथे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
दुपारी १२.४५ वाजता चामोर्शी येथे नेत्रचिकित्सा शिबिर, तर दुपारी २ वाजता घोट (ता. चामोर्शी) येथे सेवा महोत्सवांतर्गत विविध जनहिताचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान गडचिरोली येथील संपर्क कार्यालयात आयोजित अभ्यागत भेटीने होणार आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सेवाभावी उपक्रमांमुळे नागरिकांना आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील विविध सुविधांचा लाभ मिळणार असून, कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

