
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी,दि.२० जून :तालुक्यातील विविध गावांमध्ये आज भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. संघटनेची पकड अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून त्यांच्या समस्या व सूचनांवर चर्चा करण्यात आली.
कांग्रेस,युवक काँग्रेस व एनएसयूआय पदाधिकाऱ्यांनी ०२ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता स्थळ लक्ष्मी गेट ते महावितरण कार्यालय, चामोर्शी येथे काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चासंदर्भात कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली. तसेच मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजन व चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विलास चिंचघरे,युवक काँग्रेस उपाध्यक्ष हेमंत कोवासे, काँग्रेस सोशल मीडिया तालुकाध्यक्ष विजयजी लाड, आदिवासी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष पिंपल सोयाम, युवक काँग्रेस महासचिव आशिष घेर, संजय बुरांडे, गिरीश नरोटे यांच्यासह NSUI व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

