
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी, दि. १९ जून : असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट्स (AIJ) अर्थात भारतीय पत्रकार संघाने चामोर्शी येथील एस न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार, तथा TNP न्यूज व न्यूज नेशन 81 चे जिल्हा प्रतिनिधी हस्ते गजानन भगत यांच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण केले आहे. संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या निर्देशानुसार तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष एम. एम. शेख यांच्या मान्यतेने हे नूतनीकरण करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. कैलास परते आणि प्रदेश सचिव अनिल सोनवणे यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, हस्ते गजानन भगत यांचे सदस्यत्व १९ जून २०२६ ते १८ जून २०२८ पर्यंत वैध राहणार आहे.

पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेची दखल घेत भारतीय पत्रकार संघाने त्यांना पुढील कार्यकाळासाठी मान्यता दिली आहे. पत्रकारांच्या हितासाठी व संघटनेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांनी यापुढेही सक्रियपणे कार्यरत राहावे, अशा शुभेच्छा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
यावेळी संघटनेच्या वतीने हस्ते गजानन भगत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

