
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली,दि.१९ जून: गडचिरोली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवार दि.१९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी, शाखाप्रमुख तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेने हाती घेतलेल्या बी.एल.ए. (Booth Level Agent) अभियानाचा विशेष आढावा घेण्यात आला. आगामी काळात प्रत्येक बूथवर शिवसेनेचा बी.एल.ए. तयार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात आले.

प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ शिवसैनिक व मार्गदर्शक नंदूभाऊ कुमरे विधानसभा संघटक,मनोज पोरेटे चामोर्शी तालुकाप्रमुख,संतोष लोनबले धानोरा, तालुकाप्रमुख गोविंदा ब्राह्मणवाडे, गडचिरोली शहरप्रमुख पप्पू शेख तसेच युवासेनेचे पदाधिकारी चेतन उरकुडे (तालुकाप्रमुख, युवासेना गडचिरोली), समीर शेख (उपतालुकाप्रमुख, युवासेना गडचिरोली), सोहेल शेख (उपशहरप्रमुख, युवासेना गडचिरोली) यांच्यासह अनेक मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच गावोगावी संघटन वाढवून प्रत्येक बूथवर शिवसेनेचा सक्षम बी.एल.ए. निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला.

