
अरुण बारसागडे , उपसंपादक, न्यूज जागर चंद्रपूर
सावरगाव – नागभीड तालुक्यातील गिरगांव येथे काल सायंकाळच्या दरम्यान शेळया चराई करीता नेलेल्या आत्माराम दसरू बोरकर वय 52 वर्ष यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केल्याने जागीच ठार झाले.
गुरुवारी नेहमी प्रमाणे गिरगाव येथील शेतकरी आत्माराम दसरू बोरकर वय 52 वर्ष हा आपल्या शेळया चराई करीता गिरगांव जगलांगत असलेल्या कक्ष क्र.535 मध्ये चराई करीत होता.सगळया शेळया चराई करुन घराकडे परतल्या मात्र एक शेळी न आल्यामुळे पुन्हा शेळी आणण्यासाठी गेला मात्र शेळीच्या शोधात तो आपला जीव गमावून बसला.शेळी आणायला गेलेला व्यकती परत न आल्यामुळे घरची मंडळी इकडे तिकडे रात्रभर शोधाशोध घेतली मात्र पत्ता लागला नाही.

सकाळी कुंटूबियांच्या वतीने व गावकरी लोंकानी जंगलालगत शोधाशोध घेतली असता गिरगांव नियतक्षेत्र 535 मध्ये वाघाच्या हल्यात ठार झालेला आत्माराम बोरकर आढळून आला.वनविभागाला तात्काळ माहीती देण्यात आली.घटनेची माहीती मिळताच सहाय्यक वनरक्षक महेश गायकवाड,वनपरीक्षेत्र अधिकारी ए.आर.कन्नमवार,क्षेत्रसहाय्यक हिंगणकर,वनरक्षक मेकेवाड,तळोधीचे ठानेदार राहुल गुहे व वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करण्यात आला व प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी नागभीडला पाठविण्यात आले.

