
सेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा दिला संदेश
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर गडचिरोली
चामोर्शी ,दि.१९ जून:- लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चामोर्शी येथील सामान्य रुग्णालयात एनएसयूआय व युवक काँग्रेसच्या वतीने फळ वाटप आणि वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या उपक्रमातून रुग्णसेवा, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील गरजू व आजारी व्यक्तींप्रती संवेदनशीलता व्यक्त करत सेवा हाच खरा धर्म असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
तसेच पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण हा काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास युवक काँग्रेस शहराध्यक्ष विलास चिचघरे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, काँग्रेस मीडिया तालुकाध्यक्ष विजय लाड, एनएसयूआय उपाध्यक्ष तेजस कोंडेकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोगले, अमर मोगरे, डॉ. रॉय, डॉ. देवरी, राजेंद्र अल्लीवार, संजय बुरांडे, आशिष घेर, अभिषेक वाळके, अमन लाकडे, देवेंद्र धोटे, साहिल गव्हारे, आरुष भैसारे, राज चिंल्लेवार, ओमप्रकाश चौधरी, चिंतामण पोरटे तसेच एनएसयूआय व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि लोकहिताची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण करत समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.

