
नितेश गट्टीवार गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
चामोर्शी,दि.१९ जून: येथील निलेश प्रभाकर मानापूरे यांची भेंडाळा व प्रदीप चरणदास भुरसे यांची लखमापूर बोरी केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल एनएसयूआय व युवक काँग्रेस तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला चामोर्शी युवक काँग्रेस शहराध्यक्ष विलास चिचघरे ,एनएसयुआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, युवक काँग्रेस सचिव अमर मोगरे, संजय बुरांडे, ओम प्रकाश चौधरी, आशिष घेर,साहिल गव्हारे, आरुष भैसारे, राज चिलेवार आदि उपस्थित होते.


