
१०० प्रत्यक्ष, तर २०० ऑनलाइन नोंदणी; मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

चामोर्शी : श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्थेच्या सौजन्याने इम्पेरियल मंगल कार्यालय, चामोर्शी येथे रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य तेली समाज वधू-वर व पालक परिचय नोंदणी मेळावा उत्साहात पार पडला.
या मेळाव्यात १०० वधू-वरांची प्रत्यक्ष नोंदणी, तर २०० ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ३०० नोंदणींना प्रतिसाद मिळाला. यावेळी व्यासपीठावरून युवक-युवतींनी आपला परिचय करून दिला. त्यामुळे विवाहयोग्य वधू-वर तसेच त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर योग्य स्थळांची माहिती मिळण्याची संधी उपलब्ध झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, गडचिरोली होते. सहउद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजाननजी भांडेकर, अध्यक्ष मार्कंडेश्वर देवस्थान तथा सदस्य सावतेली समाज, चामोर्शी होते.
प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायत चामोर्शीचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, इम्पेरियल फंक्शन हॉलचे मालक चुडाराम सातपुते, एम. डी. चलाख, तुळशीदास कुनघाडकर, दौलतराम कोठारे, राधेश्याम घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील तेली समाजातील शिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींना एकत्र आणणे, एकाच ठिकाणी अनेक योग्य स्थळांची माहिती उपलब्ध करून देणे, वेळ व खर्चाची बचत करणे, समाजातील नाती अधिक घट्ट करणे तसेच हुंडामुक्त विवाहाला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी द्वारकाप्रसाद सातपुते, अमोल कुकडकर, कृष्णा बोदलकर, द्रोणार्थ सातपुते, विवेक सातपुते, जिजाबाई सातपुते, आशिष चलाख, उष्टुजी चलाख, यशवंत भांडेकर, दिलीप उडान, सुनील जुवारे, मोरेश्वर कोठारे, गोपिचंद बोदलकर, पवन सातपुते यांच्यासह समाजातील युवकांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक द्वारकाप्रसाद सातपुते यांनी केले. संचालन शिक्षक गजानन बारसागडे यांनी केले, तर आभार गोपिचंद बोदलकर यांनी मानले.

