
न्यूज जागर गडचिरोली
गडचिरोली/चामोर्शी, दि. १९ जून:
चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील कुणघाडा फाट्याजवळ सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संजू मालू कारसामी (वय 30), रा. भामरागड, हे दुचाकीने गडचिरोलीहून येत असताना समोरून जात असलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडकेमुळे दुचाकी ट्रकच्या मधेच घुसल्याने संजू कोरसामी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर प्रतिनिधीने पोलिस विभागाशी संपर्क साधून सिसीटीव्ही फुटेज बद्दल विचारले असता दुचाकीस्वाराने वेगाने वाहन चालवल्याने अनियंत्रित होवून सदर अपघात घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

