
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
गडचिरोली,दि.१६ जून: माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कांग्रेसचे नेते सुरेश सावकार पोरड्डीवार यांचे सुपुत्र अमेय सुरेश सावकार पोरड्डीवार यांचे आज दि. १६ जुन सकाळी ११ वाजता हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. अमेय हा केवळ ३५ वर्षाचा होता त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे ताबडतोब नेण्यात आले होते परंतु उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
अमेय यांचा निधनाची बातमी कळताच शहरात शोककळा पसरली. सुरेश सावकार पोरड्डीवार यांचे नातेवाईक सामाजिक राजाकिय कार्यकर्ते सामान्य रुग्णालय गडचिरोली व त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी झाली होती. अमेय यांचे पार्थिवावर आज दि. १६ जुनला सांयकाळी अंतिम संस्कार करण्यात येणार असुन अमेय यांच्या मृत्यु पश्चात पत्नी आई वडील आप्त परिवार आहे.


