
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर/देसाईगंज,दि.१४ जून:
देसाईगंज (वडसा)–अर्जुनी मार्गाच्या दुरवस्थेविरोधात तसेच रस्ता दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मंजूर करण्याच्या मागणीसाठी आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंज (वडसा)–अर्जुनी टी-पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ निधी मंजूर करून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, माजी उपसभापती नितीन राऊत, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, धनपाल मिसार सर, माजी जिल्हा परिषद सदस्य जयमाला पेंदाम, माजी नगराध्यक्षा शालुताई दंडवते, नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, नगरसेविका आशाताई दहिवले, फेमिदा पठाण, मंदा समर्थ, हंसराज लांडगे, इलियास पठाण, कमलेश बारस्कर, डोमजी दिवटे, सागर वाढई, खेमराज प्रधान, कैलास राणे, आरती लहरी, प्रकाश सांगाडे, गजेंद्र नाईक, गणेश करपते, उपसरपंच गजानन सेलोटे, अरुण कुंभरवार, प्रकाश समर्थ, युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अमर भर्रे, सचिन राऊत, राजेंद्र कोडपे, देवनाथ सयाम, प्रमोद मेश्राम, राजकुमार मेश्राम, नंदू चावला, प्रभाकर राऊत, शीला मेश्राम, अस्मिता रामटेके, पुष्पा बोदेले, हाजरा शेख, सुशीला गजभिये, मुक्ता चंडीकार, कैलास बगमारे, मुजीब शेख, सलीम शेख, रियाजुल शेख, मुन्नाभाई शेख, देवानंद सहारे, सुरेश मेश्राम, भास्कर वाल्हे, हिरालाल बुराडे, अनवरखा पठाण, श्रीराम मोहूर्ले, रितेश गाडगे, मनोहर खेकारे, हितेश, गजानन शेलोटे, अरुण कुंभलवार, सुरेश तोंडफोडे, पद्माकर राऊत, रोशन मेश्राम, ज्ञानदेव पिलारे, हेमराज तुपट, दिवाकर भुते, योगेश निवारे, श्रीकांत सूर्यवंशी, व्यंकट पेंदाम, सोमेश्वर ठाकरे, टोमेश्वर बगमारे, ऋषी बगमारे, प्रशांत अंकमवार, तांबेश्वर ढोरे, पवन गेडाम, प्रकाश सांगोळे, क्षीरसागर शेंडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
जनतेच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील! वडसा–अर्जुनी रोडची दुरुस्ती झाल्याशिवाय लढा थांबणार नाही.

