
{नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली}
चामोर्शी दि.१४ जून:
चामोर्शी तालुक्यातील सोमनपूर गावाला प्रत्यक्ष भेट देऊन आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी सर्व गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

या भेटीदरम्यान गावातील सर्वात मोठी आणि मुख्य समस्या समोर आली ती म्हणजे ग्रामपंचायत विभाजनाची. हे गाव मुलचेरा तालुक्याच्या ग्रामपंचायती अंतर्गत येत असल्यामुळे सोमनपूर व इतर तीन गावाला विकास निधी मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. गावकऱ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी, सोमनपूरसह चामोर्शी तालुक्यातील एकूण ३ गावांच्या ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेऊन नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करण्याचे आश्वासन आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी गावकऱ्यांना दिले.
सोमणपूर ते ठाकूरनगर दरम्यानचा पूल, गोटूल भूमीचा प्रश्न, शैक्षणिक अडचणी, गावाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) सुरू करणे आणि वाचनालय उभारणे यासारख्या इतरही अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर नागरिकांसोबत आ.नरोटे यांनी सविस्तर चर्चा केली .सोमनपूर व परिसरातील या सर्व मूलभूत समस्या सोडवून गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही आ.नरोटे यांनी गावकऱ्यांना दिली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, माजी पं.स. उपसभापती अकुलीदीदी विश्वास, माजी पं.स. सदस्य दिपक हलदर, घोट मंडळ तालुकाध्यक्ष राकेश सरकार,भाजपा आदिवासी आघाडी प्रमुख विलास उईके, माजी सरपंच सतीश रॉय, सुभाषग्रामचे सरपंच किष्णा मंडल, महेश विश्वास, विकास वैध, मारोती मडावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

