
प्रतिनिधी/रुपेश सलामे
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी कु. भुवनेश्वरी उईके हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी भुवनेश्वरी उईके हिचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबासह समाज व देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

भुवनेश्वरी उईके हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले असून तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, कुटुंबीय तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुवनेश्वरी उईके हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

