
युवक काँग्रेसचे महासचिव रोहित भाऊ शेंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा !

न्यूज जागर! चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.
मूल : मुल तालुका शहर युवक काँग्रेसचे महासचिव रोहित भाऊ शेंडे यांचा वाढदिवस सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता काँग्रेस भवन, मूल येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, इंटकचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून रोहित भाऊ शेंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रोहित भाऊ शेंडे यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच पक्षाची ताकद अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी असेच सक्रियपणे कार्यरत राहावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला.
🔴🟧🔴🟧🔴🟧🔴🟧🔴🟧🔴🟧🔴🟧🔴🟧🔴
नवनवीन बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा.. चेतन कामडे मूल.. चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी..news Jagar संपर्क मो. ९३०७५५३०१४.
News Jagar…..
🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧

