
प्रतिनिधी रुपेश सलामे
दिनांक :११ जून २०२६
देसाईगंज येथील जवाहर वॉर्डाला भेट देत आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. पाणीटंचाई, बंद पडलेली बोअरवेल व सोलर पाणीपुरवठा योजनेची बंद असलेली टाकी याबाबत नगरपरिषदेचे पाणीपुरवठा इंजिनियर वैभव आत्राम यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नाल्यांचा उपसा, स्वच्छता व रस्त्यावरील वीज खांबांबाबत संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, नगरसेवक श्याम उईके, धनपाल मिसार सर, इलियास खान, खलील खान, इमरान शेख, रियाजूल शब्बीर शेख, बबलू शेख, मुन्ना शेख, भोला खान, कैलास बगमारे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

