
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली, दि.११ जुन :
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात, हेमलकसा या दुर्गम भागात आदिवासींच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या ‘लोक बिरादरी प्रकल्पाला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी तसेच महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी भेट देऊन तेथील लोक बिरादरी रुग्णालयाची पाहणी करून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आणि आमटे कुटुंबीयांसोबत भेट घेत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.
यावेळी प्राचार्य शमशेर पठाण, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, आणि स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


