
अनेक वर्षापासून विदर्भात भेडसावणारा संत्र्याचा आणि कापसाचा प्रश्न अतिशय जटील झालेला आहे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये संत्रा आणि कापसाबद्दल शेतकऱ्यांची होत असलेली उत्पादनाची कमतरता लक्षात घेता कृषीमित्र फार्मर प्रोडूसर कंपनीच्या अंतर्गत यावर्षी हंगाम सुरू होण्याच्या आधी कापूस आणि संत्रा याचं कसं संयोजन करावे उत्पन्नात वाढ कशी व्हावी कुठल्या चांगल्या जाती आहे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रम काटोल येथील कृषीमित्र फॉर्म या ठिकाणी घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश ठाकरे तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून दिनेश कांबे पाटील होते ज्यांनी गेल्या चार-पाच वर्षांमध्ये अतिशय उत्तम काम करून ज्यांनी आपल्या संत्रा उत्पादकतेमध्ये वाढ केली आणि अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन कांबे पाटलांच्या माध्यमातून झालं त्यापैकी माननीय अरविंदजी गजभिये यांचा प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला तसेच माननीय हेमंतरावजी जिचकार ,डॉक्टर अनिलजी ठाकरे. आणि ज्यांच्या माध्यमातून सोनाळा पॅटर्न संत्रा शेती आपल्या भागात रुजल्या गेली जे प्रदीपजी भुतडा या सगळ्या प्रगतिशील तंत्र उत्पादकांचा या ठिकाणी सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला
सदर कार्यक्रमांमध्ये सोबतच कापसामध्ये अनेक वेगवेगळ्या जाती लावून आपल्या शेतामध्ये उत्पन्नाच्या माध्यमातून वाढ ज्यांनी केली असे अमरावती जिल्ह्यातले महाराष्ट्र प्रदेशचे सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोदजी सांगोळे पाटील यांना कापूस रत्नभूषण हा पुरस्कार देण्यात आला आणि आपल्या काटोल नारखेड तालुक्यात परिचित असणारे प्रगतिशील शेतकरी ज्यांनी कापसामध्ये दरवर्षी दीडशे ते 200 क्विंटल ची वाढ केली असे प्रकाशरावजी नागमोते यांना सुद्धा कापूस रत्न पुरस्कार देण्यात आला आणि कापूस शेतकऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या शेतावर जाऊन माहिती देण्यामध्ये अग्रेसर असणारे माननीय रंजीत पाटोळे यांना सुद्धा कापूस रत्न पुरस्कार देण्यात आला तर सोबतच निलेश धोटे पाटील, प्रमोदजी ठाकरे होते हे प्रगतिशील कापूस उत्पादक शेतकरी आणि दीपकरावजी मोहिते पाटील यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

या सदर सोहळ्याला मोठ्या प्रमाणात शेतकरी मंडळी उपस्थित होती सोबतच या कार्यक्रमाला खासकरून माजी गृहमंत्री माजी आमदार अनिल बाबू देशमुख हे उपस्थित झाले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री गंगाधररावजी झळके हे सुद्धा उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी वर्गांना दिनेश कांबे पाटील यांनी पूर्ण पीपीटी प्रोजेक्टर द्वारे संत्र्यावर येणाऱ्या विविध रोगांची आक्रमण त्याच्यापासून होणारे त्रास आणि सेंद्रिय जैविक पद्धतीने आणि काही ठिकाणी गरज भाजल्यास आपल्याला केमिकल पद्धतीने सुद्धा हा नायनाट करता येतो आणि याच्या माध्यमातून निरंतर जर चांगली प्रक्रिया संत्रा उत्पादक केली तर जसे आज हे पाच शेतकरी एक कोटीपर्यंत उत्पन्न संत्र्यामध्ये घेऊ शकले आपणही निश्चितमध्ये अनेक शेतकऱ्यांना याचा मार्गदर्शन या बदलत्या काळामध्ये लाभले पाहिजे असे आव्हान महाराष्ट्र हेड दिनेश कांबे पाटील यांनी केले
त्यासोबतच कापूस पिकाबद्दल विस्तृत माहिती माननीय दिनेशजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली की कापूस हे विदर्भातलं पांढरं सोन आपण ज्याला म्हणतो परंतु बदलत्या हवामानात आणि वेगवेगळ्या जाती प्रजाती लावून जे आता आव्हान नवीन चालू झालेला आहे ज्याच्यावर शेतकऱ्यांचा भरोसा आहे अशा कापूस पिकाबद्दल आपण निश्चितच त्याच्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे माहिती घेतली पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहिलं पाहिजे आणि ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आज आपण सत्कार घेत आहोत ते दरवर्षी ही वाण लावून आपल्या प्रचंड उत्पादनात भाग घेतो म्हणून यावर्षी आपण चांगल्या दोन जाती त्या ठिकाणी लोकांना सांगण्यात आल्या त्या लॉन्चिंग करण्यात आल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांनी शेवट शेतकऱ्याचे उत्पन्न शेतकरीच वाढू शकतो म्हणून कृषीमित्र प्रतिष्ठानची नेहमी भूमिका हीच राहिली आहे की शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये भर झाली पाहिजे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे या कार्यक्रमाला आवर्जून या भागातील संपूर्ण शेतकरी मंडळी तसेच आपल्या विदर्भातील अनेक जिल्ह्यातील प्रतिनिधी स्वरूपात शेतकरी मंडळी आली
.मा.अनिल बाबू देशमुख यांनी कृषीमित्र प्रतिष्ठानच्या या कार्याबद्दल अतिशय गौरव उद्गार सांगितलं की शेतकऱ्या प्रति काम करणारी ही 25 वर्षापासूनची निरंतर संस्था आहे असा त्यांचा कारभार यांचा मार्गदर्शन शेतकऱ्याला लाभो आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये प्रगती हो या कार्यक्रमाला माननीय नानाजी माळवी साहेब, कडू पाटील, लक्ष्मणरावजी महल्ले, शेखर बाबा कोल्हे, दिगंबरजी धवड साहेब त्याचप्रमाणे मोहनजी मुन्ने, यादवराव पिलांद्रे आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता यांचे सगळ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम अतिशय सुंदर आणि मोठ्या पद्धतीने पार पाडण्यात आला. कार्यक्रमाला सगळ्यांनी आभार व्यक्त केले.

