
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गाडी गडचिरोली
कोरची तालुक्यात स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात आता संताप उफाळून आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. “स्मार्ट मीटरमुळे नागरिकांची लूट सुरू आहे” असा थेट आरोप करत जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना तालुका प्रमुख सदाशिव श्यामराव नहाणे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रशासनाला इशारा दिला आहे.

वीज बिलात अचानक मोठी वाढ
मीटर रीडिंगवर संशय
स्मार्ट मीटरबाबत अपुरी माहिती
वारंवार वीज खंडित
शेतकरी व ग्रामीण भागाला मोठा फटका
नागरिकांची लूट थांबवा
जुने वीज मीटर तात्काळ बसवा
या निवेदनावर शहर प्रमुख रमाकांत निबेकर, विभाग प्रमुख अमरसिंह कल्लो, क्रिषणा सहारे सोमनाथ नुरुटी , योगेश ढवळे या पदाधिकाऱ्यांनी सह्या करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
राज्यभरात स्मार्ट मीटरवरून वाद सुरू असतानाच कोरचीतही विरोधाची ठिणगी पडली आहे. आता प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करते की निर्णय बदलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

