
नितेश गट्टीवार न्यूज जागर, गडचिरोली:
समाजवादी पक्षाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष इलियास यांनी २६ मे रोजी समाजवादी पक्षातून जिल्हा अध्यक्ष पदाचा राजिनामा देत आपल्या सहकाऱ्यांसोबत आ. विजय वडेट्टीवार आणी आ.रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
इलियास खान यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर आणी काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे, काँग्रेस पक्षात समाजवादी पक्षाचे हाजी फैझान पटेल, खलील खान, सादिक शेख, डोमाजी दिवटे, जब्बार शेख, बबलू पठाण, कैलास बगमारे, हाजरा शेख, रियाजूल शेख, मनोज राऊत, मंगेश धुर्वे, आणी सहकाऱ्यांनी प्रवेश घेतला इलियास यांच्या काँग्रेस पक्षात आगमनाने आनंदाचे वातावरण आहे, यावेळी धनपाल मिसार, राजू रासेकर, मनोज ढोरे, सागर वाढई, गाझी शेख ,विकास प्रधान, नंदू चावला आणी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


