
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली दिनांक २६ मे:
जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून रानटी हत्तींचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे विशेषतः पीक काढणीच्या काळात अति शेतात घुसून उभे पिक उध्वस्त करत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे अनेक शेतकऱ्यांसमोर जगावे की मरावे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात अनेक वेळा आंदोलन ,मोर्चे आणि निवेदने देऊनही प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेता शेवट तात्पुरत्या उपाययोजनांचे आश्वासन दिले जाते. रानटी हत्तींच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी कोणतेही ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही.

नुकतेच रानटी हत्तीचा वावर अडपल्ली, गोगाव, महादवाडी ,कुराडी, पोर्ला, जेप्रा,मौशीखांब, मुरमाडी, मरेगाव परिसरासह गडचिरोली शहरालगत च्या भागात वाढला आहे. त्याचप्रमाणे आरमोरी, वडसा, कुरखेडा ,कोरची ,धानोरा तालुक्यात सुद्धा हत्तींनी धुमाकूळ घातला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी संपूर्णता रानटी हत्ती मुळे त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना करून हत्तीचा बंदोबस्त करावा, असे मागणी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडी यांनी केली आहे. रानटी हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करण्यात आला नाही तर येत्या काही दिवसात मुख्य संरक्षक कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.

